‘मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा’, जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्रीपद हवं असतं, असं गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते तर सगळ्यांमध्ये मी देखील आलोच, असंही अजित पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलाय.
काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं. आहे. तर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार याची मला १०० टक्के खात्री असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा चांगलं काम करण्याचं आवाहन देखील केले. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सवाल केला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. तर मीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीमपदाचा चेहरा असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी करत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी मविआचा सीएमपदाचा चेहरा आहे. काय आक्षेप आहे तुमचा?’, असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. बघा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
Latest Videos
Latest News