पाकिस्तान आणि नरक यातील एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईन, जावेद अख्तर कडाडले
खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन आज थाटामाटात झाले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर यांची भाषणं झाली. जावेद अख्तर यांनी राऊत यांच्याशी मैत्री कशी झाली त्याचा किस्सा सांगितला.
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज थाटामाटात झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर आदी मान्यवर जमले होते. यावेळी भाषण करताना जावेद अख्तर म्हणाले की मी येथे राऊत यांचा एक मित्र म्हणून आलो आहे. त्यांच्या पुस्तकाविषयी मी काही वाचलेले नाही.त्यामुळे अशा वेळी भाषण काय करायचे ही पंचाईत होते. मग एकच चॉईस उरतो म्हणजे सत्कार मूर्ती म्हणजे लेखकाबद्दल बोलावे, त्यांची माझी मैत्री एका लेखावरुनच झाली होती.प्रत्येक लोकशाहीत प्रत्येक पक्षाची गरज असते.निवडणुकीची गरज असते. झालीस तर ईमानदार मीडियाचीही गरज असते. त्याच प्रकारे असे नागरिकही असावेत की जे कोणत्याच पक्षाचे नसावे. त्यांना जे चांगलं वाटलं ते बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. मी त्यापैकी एकच आहे. माझं ट्विट पाहा भरपूर शिव्या पाडतात. असं नाही की काही लोक माझं कौतुकही करतात. काही लोक म्हणतात तू काफीर आहे. नरकात जाल. काही लोक म्हणतात जिहादी तू पाकिस्तानात जा. माझ्याकडे पाकिस्तान किंवा नरकात जायची चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेन असे ते यावेळी म्हणाले.

महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...

जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार

सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक

आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
