Bala Nandgaonkar | दोन नेते एकत्र आले की चर्चा तर होणारच, फडणवीसांच्या भेटीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. दरम्यान, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. दरम्यान, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नांदगावकर म्हणाले की, दोन नेते एकमेकांना भेटले की काही ना काही राजकीय चर्चा होतेच. तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावा. मी वैयक्तिक कारणासाठी या भेटीला आलो होतो. नांदगावकरांच्या सूचक वक्तव्यानंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. (If two leaders come together, there will be a Political discussions, Bala Nandgaonkar on Fadnavis visit)
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

