Nashik | इगतपुरीतील खळखळते धबधबे धुक्यात हरवले, इगतपुरीच्या सौंदर्यानं पर्यटक घायाळ

तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा धरण, दारणा धरण, नगरपालिका डॅम, रेल्वे तलाव, तळेगाव डॅम, कपारेश्वर महादेव, घाटनदेवी मंदिर, उंटदरी, भाम धरण तसेच विश्वविख्यात विपश्यना केंद्र ही येथेच आहेत. आदी ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे.

इगतपुरी : मागील आठवड्यापासून इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरण साठयात कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे ठीक ठीकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा धरण, दारणा धरण, नगरपालिका डॅम, रेल्वे तलाव, तळेगाव डॅम, कपारेश्वर महादेव, घाटनदेवी मंदिर, उंटदरी, भाम धरण तसेच विश्वविख्यात विपश्यना केंद्र ही येथेच आहेत. आदी ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा काळ असल्याने येथे पर्यटकांना येण्यासाठी बंदी असूनही चोरी छुप्या मार्गाने पर्यटक शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात हजेरी लावत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI