Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

निवडणुका लावल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे 26 तारखेला एक हजार ठिकाणी चक्काजाम केला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 23 June 2021

1) दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकार विविध प्रश्नांपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे.

2) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकांवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

3) निवडणुका लावल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे 26 तारखेला एक हजार ठिकाणी चक्काजाम केला जाणार असल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

4) आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, हा आमचा शब्द आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI