संजय शिरसाट आरोपांच्या घेऱ्यात, 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा जलील यांचा आरोप; ED कडे जाणार?
संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आरोप केले आहेत. यामध्ये 13 कोटींच्या तीन जमिनी घेतल्याचे गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केले याबाबत सरकारने लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार असा इशारा जलील यांनी दिला आहे. जमिनीसंदर्भात जलील मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना भेटणार आहेत तर दुसरीकडे जलील यांच्या घरावर शेण फेकण्यासाठी येलेल्या शिरसाट समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी तीन ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी विकत घेतल्याचा हल्लाबोल केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी शिरसाट यांच्यावर जमिनीवरून गंभीर आरोप केले आहेत. शेंद्रा एमआयडीसीमध्ये शिरसाट यांनी सहा कोटींची जमीन घेतल्याचा आरोप जलील यांनी केला. ही सहा कोटींची जमीन शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर घेतल्याचा दावा जलील यांनी केलाय. दुसरीकडे जालना रोडवर 12000 स्क्वेअर फूटची जागा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर घेतल्याचा आरोप जलील यांनी केला. या जागेची किंमत पाच कोटी 83 लाख 94 हजार असल्याचं जलील यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमधल्या शहाजापूरमध्ये दोन ठिकाणी मिळून 10 एकर चार गुंठे जागा घेतल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलाय. या जागेची किंमत दोन कोटींपेक्षा अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही जागा शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर घेतल्याचा दावाही जलील यांचा आहे.

मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी

उंची पेंग्विनची जीव केवढा? अन् डोळे... ठाकरेंची नितेश राणेंवर टीका

मान्सून पिकनिक प्लान करताय? या पर्यटनस्थळांवर 2 महिने No Entry, कारण..

हिंदी भाषा सक्तीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, सक्ती योग्य नाही पण...
