Imtiaz Jaleel : भाजप कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा; इम्तियाज जलील यांच्या घरासमोर कडक बंदोबस्त
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जलील यांच्या घराबाहेर हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जलील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले जात आहे. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते जलील यांच्यावर चांगलेच संतापलेले आहेत. तर शिरसाट यांच्याकडून देखील इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट सध्या चांगलचं टोकाला गेलेलं बघायला मिळत आहे.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

