Mumbaiमध्ये दिवसभरात 20,971 नवे Corona रुग्ण, 6 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) आता अधिक वेगानं होताना दिसत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात (Mumbai City) आज 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्वीटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI