AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यात गुंडांचा तलवारी-कोयत्यांसह धुमाकूळ, घरात शिरून महिला-लहान मुलांना मारहाण

| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 7:41 PM
Share

स्थानिक नागरिक आणि महिलांनी या गुंडांमुळे आम्ही सर्वजण भयभीत झालो असून जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. लहान मुले, वृद्ध महिला यांना मारहाण करणाऱ्या या गुंडांवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे : सय्यदनगरमध्ये गल्ली नं 11 व 12 मध्ये रस्त्यावर स्थानिक लँड माफिया गुंडांच्या टोळीने सोमवार रात्री 9.30 च्या सुमारास तलवारी कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच केला. सय्यदनगर परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी 20 ते 22 गुंडांनी घरांमध्ये घुसून महिला व लहान मुलांना मारहाण केली तर पुण्यातील मंगळवार पेठेतील मुजिफ तांबोळी हा तरुण व्यापारी टीव्ही स्पेअर पार्टसचे बिल देण्याकरीता आला होता. त्याच्यावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि त्याच्याजवळ असलेले 27 हजाराची रक्कमही या गुंडांच्या टोळक्याने लुटली. यावेळी स्थानिक नागरिक आणि महिलांनी या गुंडांमुळे आम्ही सर्वजण भयभीत झालो असून जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. लहान मुले, वृद्ध महिला यांना मारहाण करणाऱ्या या गुंडांवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.