राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मनसेची जोरदार पोस्टरबाजी

अयोध्या (Ayodhya) तर नाही पण पुण्यात मात्र राज ठाकरे दाखल झाले आहेत. परवा म्हणजेच 22 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 20, 2022 | 7:35 PM

पुणे : अयोध्या (Ayodhya) तर नाही पण पुण्यात मात्र राज ठाकरे दाखल झाले आहेत. परवा म्हणजेच 22 मेला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा जंगी घेण्याच्या सूचना आधीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता मध्ये दोन दिवस आहेत. या दोन दिवसांत पुण्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा तसेच 22 तारखेच्या सभेच्या तयारीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव पुणे दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला गेले होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें