India Bans Pakistani : भारताचा पाकवर पॉवरफुल्ल डिजिटल स्ट्राईक अन् दाखवली जागा, भल्या-भल्यांना थेट भारतात बॅन
भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि कलाकारांचे सोशल अकाउंट्स भारतामध्ये बॅन करण्यात आले आहेत. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन अफरीदी यांचे इन्स्टाग्राम भारतामध्ये बंद करण्यात आले. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे युट्यूब चॅनल सुद्धा भारतामध्ये बंद करण्यात आलेला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्सचे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा भारतात बॅन करण्यात आलेत. क्रिकेटर बाबर आझम, शाहीन अफरीदी, मोहम्मद रिझवान यांचे इन्स्टाग्राम अकाउंट भारताने बॅन केले. क्रिकेटर्स सोबत पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंट सुद्धा भारतात बॅन करण्यात आलेत. माहिरा खान, हानिया आमिर, अली जफर, सजल अली, माया अली, इकरा अजीज यासह सानम सईद या पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटला भारतात बंदी घालण्यात आली आहे. यातल्या माहिरा खान, सजल अली, अली जफर यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचेही युट्यूब चॅनल भारताने बॅन केले. माजी पंतप्रधान इमरान खान यांचेही इन्स्टाग्राम अकाउंट बॅन करण्यात आले. याआधी 16 युट्यूब चॅनेल्सवर भारताने बंदी घातली होती. पाकिस्तानने सुद्धा प्रतिकारवाई म्हणून भारतीय गाण्यांना रेडिओवर बंदी घातली. पाकिस्तानात लता मंगेशकर, रफी यासह किशोर कुमार यांची गाणी प्रसिद्ध आहेत. ही गाणी पाकिस्तानी रेडिओवर वाजवण्यात येत होती. मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
