यंदा भारतात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. परिणामी चालू वर्षात भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा साखर उत्पादक देश बनला आहे. या स्पर्धेत भारताने ब्राझिलला मागे टाकले आहे. तर भारत हा साखर निर्यात करण्यामध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्पादन वाढल्याने निर्यातीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.