World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक, विजयापासून 1 पाऊल दूर
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून मात देत अंतिम फेरीत धडक मारली आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद १२७ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने भारताने ३३९ धावांचा यशस्वी पाठलाग केला. आता अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी रंगणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघावर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये फिबी लिचफिल्डने शतक झळकावले, तर एलिसा पेरीने ७७ आणि एश्ले गार्डनरने ६३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताने ३३९ धावांचे आव्हान ४८.३ षटकांत पूर्ण करत विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरल्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर. जेमिमाने १३४ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह नाबाद १२७ धावांची दमदार खेळी केली. तर तिने हरमनप्रीतसोबत १६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. नॉकआउट सामन्यात शतक झळकावणारी जेमिमा हरमनप्रीत कौरनंतरची दुसरी भारतीय खेळाडू ठरली. हा भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होता. आठ वर्षानंतर भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

