India Vs Pakistan War : पाकला करारा जवाब, भारतानं या 9 ठिकाणचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा; बघा VIDEO
पाकिस्तानच्या सीमेला अगदी लागून पुंछ आहे. आणि त्यामुळे या भागांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जातो. पुंछ भागांमध्ये मोठं नुकसान त्यामुळे झालं असून पुंछ गावांमध्ये पाकिस्तानने काल संध्याकाळपासूनच गोळीबार करण्यास सुरुवात केलेली होती.
बीएसएफने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. रात्री ११ वाजता दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यानंतर जम्मू-काश्मीर सीमेवर बीएसएफ सतर्क झालेला असून गस्त वाढवण्यात आलेली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सात मिसाईल पाडण्यात आलेले आहेत. पाकिस्तानने काल वारंवार ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र एस ४०० च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे सगळे मनसुबे उधळून लावलेले आहेत. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला याठिकाणी परतवून लावण्यात आलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचे सात मिसाईल्स पाडण्यात आलेले आहेत.
जम्मू-काश्मीर सीमेवरून सात दहशतवादी आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. जम्मू-काश्मीर सीमेवर बीएसएफ देखील सतर्क आहे. त्यांनी हा प्रयत्न उधळून लावलेला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरच्या पुंछ भागातील अजोते गावात पाकिस्तानकडून गोळीबार झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुंछ भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय. पुंछच्या नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तानकडून करण्यात आले होते. त्यात अनेक घरांचं, धार्मिक स्थळांचं नुकसान झालेले होते. शाळांचं नुकसान झालेले होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

