India vs Pakistan War : राजस्थानात पहाटे पुन्हा स्फोट तर मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाकचे 3 एअरबेस उद्ध्वस्त, बघा VIDEO
राजस्थानसह जैसलमेर या ठिकाणी देखील पाकिस्तानने ड्रोन हल्ले, गोळीबार अन् तोफगोळे डागत घरांसह वाहनांचं मोठं नुकसान केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पाकिस्तानचे चार एअरबेस भारताकडून नष्ट कऱण्यात आले आहेत.
पाकिस्तानी सैन्याचे चार एअरबेस भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसचा यामध्ये समावेळ आहे. या एअरबेसच्या ठिकाणी रात्री 3 च्या सुमारास स्फोट झाला. भारताकडून करण्यात आलेल्या स्फोटात या चारही एअरबेसच मोठं नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेरमध्ये पहाटे 5.15 वाजता पुन्हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये नागरिक साखर झोपेत असतानाच स्फोटाचा मोठा आवाज आला आणि बाडमेरचे नागरिक पूर्णतः हादरून गेलेत. राजस्थान, गुजराब, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या चार राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काल रात्री ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. भारताच्या सीमावर्ती भागातील काही शहरं ही पाकिस्तानच्या टार्गेटवर होती. ही माहिती मिळताच या शहरात काल रात्री पूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आलं होतं. मात्र तरीही राजस्थानच्या बाडमेरमध्ये पहाटे 5.15 वाजता पाककडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

