Smriti Mandhana Wedding : लग्न मंडपातच स्मृती मानधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा ढकलला पुढे अन्…
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मनधानाचा विवाह सोहळा तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीतील मंडपाच घडलेल्या या घटनेनंतर श्रीनिवास मनधाना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांच्या पूर्ण बरे होईपर्यंत लग्न करणार नाही, असा निर्णय स्मृतीने घेतला असून, विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मनधानाचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आज सांगलीमध्ये संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत तिचा विवाह होणार होता. मात्र, लग्न मंडपातच स्मृतीचे वडील, श्रीनिवास मनधाना यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळी नाश्ता करत असतानाच श्रीनिवास मनधाना यांची तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखत असल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती स्थिर होईपर्यंत लग्न करणार नाही, असा निर्णय स्मृती मनधानाने घेतला आहे. यामुळे विवाहस्थळावरील सर्व तयारी थांबवण्यात आली असून, पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावरच विवाह सोहळा पार पडेल.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

