तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तहव्वुर राणाला एनआयएची कोठडी मिळाली असली तरी त्याच्याबाबत 5 नियम पाळावेच लागणार आहेत.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तहव्वुर राणाला पटियाला हाऊस कोर्टाने 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता आजपासून तहव्वुर राणाची चौकशी सुरू होणार आहे. तहव्वुर राणाच्या चौकशीसाठी एनआयएच्या मुख्यालयात विशेष सुरक्षा सेल तयार करण्यात आलेला आहे. एनआयएचे डिजी, आयजी, डीआयजी यांच्यासह 12 अधिकारी या सेलमध्ये जाऊ शकतात. 26/11 हल्ल्याची दृश्य, व्हिडीओ, ई-मेल तसंच व्हॉईस रेकॉर्डिंग राणाला ऐकवल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसच पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांशी केलेल्या बातचीत संदर्भात देखील राणाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. रानच्या माध्यमातून पाकच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
दरम्यान, तहव्वुर राणाबाबत भारतापुढे 5 नियम आहेत. 26/11च्या हल्ल्याशीवे इतर कोणत्याही प्रकरणात राणाला शिक्षा होणार नाही, म्हणजेच त्याच्या विरोधात इतर दहशतवादी हल्ल्यांचे गुन्हे दाखल होणार नाहीत.
भारत तहव्वुर राणाला इतर कोणत्याही देशाकडे प्रत्यरपण करू शकत नाही. कोणत्याही देशाने कितीही दबाव आणला तरी भारतातून त्याच प्रत्यरपण अशक्य आहे. तहव्वुर राणाच्या सुनावणीत पारदर्शकता राखी जाईल.
तहव्वुर राणाला स्वत:च्या बाजूने स्पष्टीकरण देण्याची पूर्ण संधी दिली जाईल. भारताच्या उच्च न्यायालयात राणा शिक्षे विरोधात अपील देखील करू शकतो. म्हणजेच राणाला भारतात आणण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच वेळ शिक्षेला लागण्याची शक्यता आहे.
राणाच्या प्रत्यरपणानंतर त्याची सगळी जबाबदारी भारताची असेल. भारतसरकारला राणाच्या राहण्याची, जेवणाची, कपड्यांची सगळीच व्यवस्था करावी लागेल. तो निरोगी राहील याचीही खात्री करावी लागेल.
भारताला 1962 च्या प्रत्यरपण कायद्याचे पालन करावे लागेल. कायद्यानुसार गुन्हेगाराला समुपदेशकाची परवाग्नी द्यावी लागेल. गरज पडल्यास त्याला त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी द्यावी लागेल.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

