Paris Olympics : भारताला सर्वात मोठा धक्का… पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र, नेमकं कारण काय?
Vinesh Phogat at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून समोर आलेल्या निर्णयाने समस्त भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातील स्पर्धेत विनेश फोगाटनं काल अंतिम फेरीत धडक दिली होती. सेमी फायनल स्पर्धेतील एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं मात्र विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.
पॅरिस ऑल्मिकमध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आली आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आल्याने विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही. सेमी फायनलमध्ये विजय मिळवत विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र काही ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट पॅरिस ऑल्मिक स्पर्धेत अयोग्य घोषित करण्यात आली आहे. या निर्णयाने केवळ विनेश फोगाट हिची निराशा झाली नाहीतर संपूर्ण भारताची निराशा झाली आहे. दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेत खेळण्यासाठी जी वजनाची मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या नियमानुसार कोणत्याही कुस्तीपटूना कोणत्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
Latest Videos
Latest News