West Bengal Election | मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

West Bengal Election | मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 21, 2026 | 1:15 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेचं कामकाज बंद झाल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना ही घडामोड महत्त्वाची मानली जाते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेचं कामकाज बंद झाल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणुकी आधीच ममात बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. अलीकडेच कंपनी बंद का आहे याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका असलेल्या आय-पॅक कंपनीच्या कोलकाता येथील विधाननगर कार्यालयाबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे कार्यालय बंद असल्याची माहिती समोर आली असून, एचआरकडून सुमारे 1300 कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

काह दिवसांपूर्वीच आय पॅक कंपनीच्या कार्यालयावर इडीने छापेमारी केली होती. छापेमारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून या बातम्या फेटाळण्यात आल्या आहेत. टीएमसीच्या खासदारांनी पक्ष अनेक एजन्सीसोबत काम करत असल्याचं सांगितलं. तसेच संघटना चार स्तरांवर कार्यरत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Published on: Apr 21, 2026 01:15 PM
Follow Us