अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
इराणने बॉम्ब टाकलेल्या फोर्डो साइटवरून युरेनियम आधीच काढून टाकल्याचा दावा इराणने केला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्या आधीच इराणने युरेनियम इतरत्र हलवले होते. अमेरिकेने ज्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला, तिथे कोणतीही अणू गळती झालेली नाही आणि युरेनियम आधीच हटवण्यात आले होते, असा दावा इराणने केला आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करून ती नष्ट केल्याचा दावा केला आहे. इराण या हल्ल्याला युद्धाची अनावश्यक कारवाई मानत असून, अमेरिकेला चेतावणी दिली आहे की ते गप्प बसणार नाहीत आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. दरम्यान, अमेरिकेने बॉम्ब टाकलेल्या इराणच्या तीन अणुस्थळांपैकी फोर्डो हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फोर्डो येथे महत्त्वाची भूमिगत युरेनियम संवर्धन सुविधा असल्याचे सांगितले जाते. पण फोर्डो अणुस्थळ कॉम काउंटीमध्ये आहे. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकी हल्ल्यानंतर अणुस्थळातून कोणतेही धोकादायक पदार्थ उत्सर्जित झाले नाहीत, कारण हे केंद्र आधीच रिकामे करण्यात आले होते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
