Jalgaon Crime : गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
Jalgaon Crime Case : धारधार शस्त्राने गळा चिरून 14 वर्षीय मुलाची हत्या झालेली असल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगावच्या जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातल्या रिंगणगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. राजेश गजानन महाजन असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून, तो कालपासून बेपत्ता होता. काल याठिकाणचा बाजार होता. राजेश याच बाजारात गेलेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने त्याचा शोध घेतला. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पुढील तपास सुरू केलेला आहे.
राजेशच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आलेला होता. ही हत्या पूर्ववैमनस्य किंवा इतर वादातून झाल्याची कोणतीही शक्यता समोर येत नसली तरी हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्यादृष्टीने तपास केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना देखील ताब्यात घेतलं आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
