Jalgaon News : 5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
Jalgaon Jawan Manoj Patil : भारत पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाने सुट्टीवर असलेल्या जवानांना पुन्हा सीमेवर बोलावण्यात आलं आहे. लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या एका जवानाला देखील लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळदीच्या अंगाने पुन्हा सीमेवर जावं लागलं आहे.
जळगावच्या पाचोरा येथील मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत. त्यांचा सोमवारी म्हणजे 5 मे रोजी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणं आलं आहे. देशावर सध्या संकट ओढवलं आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावामुळे सीमेवर परिस्थिती बिघडली आहे. भारतीय लष्कर पाकिस्तान्यांना चांगलच पुरून उरत आहे. कालपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. याच सगळ्या परिस्थितीत जवान मनोज पाटील यांना तत्काळ पुन्हा सेवेत रुजू होण्याचा फोन आला. त्यामुळे सोमवारी मनोज पाटील हे हळदीच्या अंगाने आणि हातावरच्या भरल्या मेहंदीनेच पुन्हा सीमेवर रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीला देखील अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

