AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu And Kashmir Election Results : मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर

Jammu And Kashmir Election Results : मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर

| Updated on: Oct 08, 2024 | 10:49 AM
Share

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या 90-90 जागा आहेत. त्या-त्या राज्यातील आकडेवारी आता समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजप स्वबळावर रिंगणात उतरले होते. त्याचे निकाल आता समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. त्यानंतर आता थेट 2024 मध्ये निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने लढत आहेत. तर भाजप एकटा निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, काश्मीरमधून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. साडे ९ वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस तब्बल 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 27, पीडीपी 3 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत.

Published on: Oct 08, 2024 10:48 AM