Talathi recruitment exam : ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची कबड्डी’; राष्ट्रवादीच्या नेत्याची खोचक टीका
राज्यात प्रतिक्षेत असणारी तलाठी भरती अखेर सुरू झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुस्कारा सोडला होता. मात्र परिक्षा सुरू होताच त्यांचा भ्रमनिराश झाला. तलाठी भरती परीक्षेत गोंधळ उडाला आहे.
नागपूर : 21 ऑगस्ट 2023 | बहू प्रतिक्षेत असणारी तलाठी भरती परिक्षेला आज सुरूवात झाली. मात्र राज्यातील अनेक परिक्षा केंद्रांवर सावळा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत उभे राहावं लागलं आहे. अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाला. त्यावरून आता राजकारण तापलेलं दिसत आहे. तर यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळखंडोबा सुरू आहे. या सरकारला काहीच वाटत नाही. गांभीर्यच नाही. सरकारला हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा याचं लागलं आहे. तर याचं मंत्रिपद जातंय का? त्याचं मंत्रिपद जातंय का? मुख्यमंत्री पदावरनं काढतायेत का? त्याला मुख्यमंत्रीपद कधी मिळतय? याच्यातच मंत्रालयातले सगळे अधिकारी रमलेले आहेत. मग तो मुख्यमंत्री होत असेल तर त्याच्यामागे जायचं. त्याच्या कॅबीनच्या बाहेर अधिकारी बसलेले असतात. तर हा मुख्यमंत्री होणार नाही म्हणून याच्या इथनं निघालेले असतात. सावळा गोंधळ महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रात राजकारणाची कबड्डी झालीय. खो-खो कबड्डीचे खेळ असतात ना की तो समोरचा उठतो आणि आपला ही खो देतो. असंच सध्या या तिघांमध्ये सुरू असल्याची टीका केली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

