Video | अधिवेशनातील प्रकार लोकशाहीचा अपमान करणारा : जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनातील प्रकार हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असे म्हटलंय. तसेच सर्वांनीच थोडा धीर धरायला पाहिजे. मुद्दा मांडणे तसेच खोडून काढणे हे अपेक्षितच असते, असेही ते म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 05, 2021 | 6:17 PM

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचबरोबर शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनातील प्रकार हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असे म्हटलंय. तसेच सर्वांनीच थोडा धीर धरायला पाहिजे. मुद्दा मांडणे तसेच खोडून काढणे हे अपेक्षितच असते, असेही ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें