Jitendra Awhad Video : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात धडक.. रिकाम्या खुर्चीसमोर अंड्यांचा खच, जितेंद्र आव्हाड का भडकले?
ठाण्याच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये धडकल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यातील त्यांच्या खुर्चीसमोरील टेबलावर अंड्याचे काही कॅरेट्स ठेवलेत.
ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये शालेय पोषण आहारातून अंडी बंद केल्याचा आरोप होतोय. या आरोपानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आणि थेट ठाण्याचं जिल्हाधिकारी कार्यालयच गाठलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते होते. तर त्यांच्या हातात अंड्यांचे काही कॅरेट्स असल्याचेही पाहायला मिळाले. ठाण्याच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये धडकल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यातील त्यांच्या खुर्चीसमोरील टेबलावर अंड्याचे काही कॅरेट्स ठेवलेत. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचे निवेदन देत सोबत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना अंडी आणि नाचणी सत्त्व दिलं आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांना सरकारकडे ही बाब पोहचविण्याची विनंती केली आहे. गरीब मुलांना पौष्टिक आहार सुरूच राहावा यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी विनंती केली आहे. त्यांनी अंडी आणि नाचणी सत्त्व घेऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या कार्यालयात धडक दिली. त्याचबरोबर मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याबाबत संतापही व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

