Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्रा 3 वेळा मुंबईला, गर्दीच्या ठिकाणी वावर अन् गणेशगल्ली, लालबागचा राजा…
ज्योती मल्होत्राने मुंबईत अनेक भागात फिरताना फोटो, व्हिडीओ काढले. 2023 साली तिने लालबागचा राजा, तसेच गणेशगल्लीचा राजा येथे फिरून तिथली गर्दी, याचा व्हिडीओ काढला होता, त्याचे अनेक रेकॉर्ड हे तपास यंत्रणांना मिळाले आहेत.
हरियाणाच्या हिसारमधील ज्योती मल्होत्रा हिच्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राने तीन वेळा मुंबईला भेट दिल्याची माहिती आहे. ज्योती गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला आली होती. गर्दीच्या ठिकाणी जसं की लालबागचा राजा आणि गणेशगल्लीचा राजा अशा ठिकाणी तिचा वावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबईला आल्यानंतर ज्योती मल्होत्राने दोन वेळा ट्रेनने तर एकदा बेस्ट बसने प्रवास केल्याची माहिती आहे. गणेशोत्सवाच्या काळातही मुंबईत येऊन येथील गर्दीचे, विविध ठिकाणांचे फोटो, व्हिडीओ तिने काढल्याचे समोर आले आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीन वेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईला भेट दिली होती. दरम्यान, मुंबईची तिने रेकी केली होती का, त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.