Kalamb Crime : कळंब हत्या प्रकरण : 2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
Manisha Bidawe Death Case : कळंबच्या मनीषा बीडवे हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी रामेश्वर भोसले हा 2 दिवस महिलेच्या मृतदेहाच्या सोबतच राहिला, असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
कळंबमधूळ मनीषा बीडवे हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले हा 2 दिवस त्याच घरात मृतदेहासोबत राहिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इतकंच नाही तर मनीषाच्या मृतदेहाच्या बाजूला बसून या आरोपीने जेवण देखील केलं. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर भोसले अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत.
मनीषा बीडवेची हत्या केल्यानंतर हाच आरोपी रामेश्वर भोसले त्याच घरात मृतदेहासोबत तब्बल 2 दिवस राहिला. तसंच मृतदेहाच्या शेजारी बसून त्याने जेवण देखील केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तो महिलेची गाडी घेऊन् बाहेर पडला. त्यानंतर आपल्या केजमधल्या मित्राला घटनास्थळी बोलावून रामेश्वरने हा मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बीडवे यांचा ड्राइव्हर म्हणून काम करायचा. तर आक्षेपहार्य व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला त्रास देत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

