मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी….

मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी….

| Updated on: Jul 27, 2026 | 6:24 PM

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आता आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आंदोलनातील प्रमुख अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका मांडली.

कपिल सिब्बल यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर देशातील कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांवर FIR दाखल झाल्यास त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी देशभरातील वकिलांना एका संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

यावेळी कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठी घोषणा करत, विद्यार्थी आंदोलनासाठी कायदेशीर मदतीसाठी स्वतः 1 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. हा निधी केवळ लीगल हेल्पसाठी वापरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतरांनीही या उपक्रमाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यावेळी सौरव दास यानेही सांगितले की, सरकारच्या आश्वासनांवर आम्ही आंदोलन थांबवलं आहे. जर आश्वासनं पूर्ण झाली नाही तर आम्हाला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल.

Published on: Jul 27, 2026 6:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us