कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा मुख्यमंत्री, या दिवशी होणार शपथविधी

कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा मुख्यमंत्री, या दिवशी होणार शपथविधी

| Updated on: May 28, 2026 | 5:41 PM

कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुत्रांच्या माहितीनुसार, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी के शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार.  येत्या 30 मे रोजी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मोठी चर्चा झाली होती. त्या वेळी डी के शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात होते. मात्र सिद्धरामय्या यांच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

त्याच वेळी काँग्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी सिद्धरामय्या आणि त्यानंतर डी के शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असे ठरवण्यात आले होते.

Published on: May 28, 2026 5:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us