Karti Chidambaram : मोठी बातमी! कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयची अटक

मंगळवारी सीबीआयच्या पथकाने कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयासह 9 ठिकाणी छापे टाकले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 18, 2022 | 11:05 AM

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने (CBI) अटक केली आहे. कालच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम यांचा निकटवर्तीय भास्कर रमण याला सीबीआयने अटक केली आहे. त्याच्यावर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या 9 मालमत्तांवर काल छापे टाकण्यात आले होते. चीनशी (China Visa Case) संबंधित एका प्रकरणावरून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये भास्कर रमण यालाही अटक करण्यात आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें