AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karuna Sharma : करूणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?

Karuna Sharma : करूणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?

| Updated on: Apr 05, 2025 | 1:15 PM
Share

धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी होतोय. सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी पार पडतेय. तर करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांचे लग्नच झाले नाही असा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दावा केला होता. करूणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय वांद्रे कोर्टाकडून धनंजय मुंडे यांना देण्यात आला होता.

करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने निर्णय दिला होता. मात्र धनंजय मुंडे यांच्याकडून या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. दरम्यान, यासंदर्भातच आज माझगाव कोर्टात सुनावणी सुरू आहे. तर आजच्या कोर्टातील युक्तिवादात करूणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्याशी विवाह झाल्याचे पुरावे देखील सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी सुरू आहे. करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे कोर्टाने त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सूचवलं होतं. त्यामुळे करुणा शर्मा या आज कागदपत्र सादर करणार का? कागदपत्रे सादर केल्यास ती कोर्ट ग्राह्य धरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या युक्तिवादात दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून काय सांगितलं जातं, काय दावे आणि प्रतिदावे केले जातात यावरही या केसचा निर्णय अवलंबून आहे. आज दुपारपर्यंत या केसचा निर्णय येऊ शकतो, असं जाणकार सांगत आहेत.

Published on: Apr 05, 2025 01:13 PM