Kerala Periyar River Flood | केरळमधील पेरियार नदीच्या पाणी पातळीत वाढ

त्याचवेळी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये आणि मुल्लापेरियार, इदमलायार, बानासुरा सागर, कक्की आणि पंबा या नद्यांमध्ये जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 10, 2022 | 9:39 AM

भारतीय हवामान विभागाने बुधवारपर्यंत केरळच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ नवीन दाब निर्माण झाल्यामुळे 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.भारतीय हवामान विभागाने केरळच्या किनारी भागासाठी इशारा जारी केला असून बुधवारपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे म्हटले आहे. त्याचवेळी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये आणि मुल्लापेरियार, इदमलायार, बानासुरा सागर, कक्की आणि पंबा या नद्यांमध्ये जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे केरळमधील पेरियार नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें