Kharghar News : खारघरच्या पांडवकड्याजवळ अडकलेल्या पाच विद्यार्थांना वाचवलं
मुसळधार पावसानंतर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी खारघरच्या पांडव कड्यावर गेलेल्या आणि अडकून पडलेल्या पाच विद्यार्थ्यांना वाचवण्यात आलं आहे.
खारघरमधील पांडवकडा येथे असलेल्या धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं आहे. एकूण पाच विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने एकीकडे मुंबईच्या सखल भागांत पाणीचपाणी झालेलं आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य मात्र अधिकच खुललेलं आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी असलेले धबधबे देखील वाहायला सुरुवात झालेली आहे. खारघरमध्ये असलेल्या पांडवकड्याला पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी भेट देत असतात. आज देखील पांडव कडा येथे धारावीमधील 5 विद्यार्थी धबधब्यावर गेलेले असताना धबधब्याचा जोर अचानक वाढल्याने हे विद्यार्थी वर अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या पाचही विद्यार्थ्यांना कड्यावरून सुखरूप खाली उतरवण्यात आलेलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

