किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?

किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 25, 2026 | 4:25 PM

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील किनगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला. एका गटाने पथसंचालनाला अडवल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक पथसंचालन दरवर्षीप्रमाणे आज किनगावमध्ये काढण्यात आले होते.

पथसंचालन सुरू असताना, एका गटाने ते अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दगडफेकीचाही प्रयत्न करण्यात आला. यामुळे काही काळ मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच, जळगाव जिल्ह्याचा मोठा पोलीस बंदोबस्त किनगाव परिसरात तातडीने तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, परिसरात शांतता राखली जात आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांनी स्वतः या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांनी शांतता राखावी आणि समाजकंटकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे

Published on: Oct 25, 2026 4:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us