उदय सामंतांचे बंधू विधानसभेसाठी इच्छुक, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत देणार टक्कर?
येत्या काही महिन्यांवर आगामी विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. अशातच कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. बघा काय आहे मोठी बातमी?
कोकणातील राजापूर-लांजा विधानसभेसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या राजन साळवी यांना किरण सामंत टक्कर देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे कोकणात किरण सामंत यांनी देवाचे गोठणे येथे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडले आहे. देवाचे गोठणे येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून किरण सामंत हे निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. पण वेळेवर नारायण राणे यांना महायुतीतून उमेदवारी देण्यात आल्याने त्यांना संधी मिळाली नाही. मात्र आता आगामी विधानसभा निवडणूक राजापूर-लांजा येथून लढवणार असल्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
Latest Videos
Latest News