खेडवरुन Kirit Somaiya दापोलीकडे रवाना
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीवर रोज तुटून पडत आहे. कधी संजय राऊत, कधी नवाब मलिक, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि आज अनिल परब(Anil Parab), किरीट सोमय्यांची आरोपांची मालिका संपत नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीवर रोज तुटून पडत आहे. कधी संजय राऊत, कधी नवाब मलिक, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि आज अनिल परब(Anil Parab), किरीट सोमय्यांची आरोपांची मालिका संपत नाहीये. आता दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्यात रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र आधी सोमय्यांना राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी कडकडीत इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी येऊनच दाखवावं, हे कोकण आहे, गुजरात नाही, आम्ही त्यांना अडवणार आहे. किरीट सोमय्यांच्या येण्याने पर्यटनावर परिणाम होईल असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

