पुणे- काल विधिमंडळात गृहमंत्र्यांनी (Home Minister)पोलीस दलाची ठामपणे पाठराखण केलीय. आता त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी तुमची आहे. भ्रष्टाचार, खंडणी, असे गैरप्रकार करु नका. याबरोबरच असे गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका अशी सूचना पोलिसांना दिली आहे. आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोफोर्स (Bofors scam)झाला असं म्हटलं जायच. आता असं म्हणतात की याचा सचिन वाझे (Sachin Waze)झाला. हा सचिन वाझे आहे. कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला सर्व्हिसमध्ये घेतलं. अर्थात कायदा आपलं काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपुर्ण पोलीस दल बदनाम होतं. ते होणार नाही याची काळजी घ्या अश्या सूचना पोलिसांनी देताना , अजित पवार यांनी विरोधकांनाही चिमटे काढले.
पी एची घेतली फिरकी
माझा स्वतःचा फोन नंबर एका बहाद्दर पठ्ठ्याने असे सॉफ्टवेअर डेव्हलप केले की माझ्याच मोबाईल नंबरवरून फोन केल्याच वाटलं आणि वीस लाख रुपये मागितले. पण माझ्या नंबरवरून फोन केला की कॉलर आयडीमुळे फोन नंबर येत नाही. हे ज्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीला माहित होतं. चौबे का कोणाचे नाव घेतले. आता याने केला होता की आणखी कोणी केला होता काय माहित अजित पवारांनी त्यांच्या शेजारी उभे असलेल्या चौबे नावाच्या त्यांच्या पी ए ची फिरकी घेतली. ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत विविध उपक्रमांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होतय
…पण मीडियाने ठोक ठोकलं काल मुख्यमंत्र्यानी असं म्हटलं , की आमदारांना घर देऊ. पण मीडियाने असं म्हटल की आमदारांना फुकट घरं देणार. पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही . ज्यांना मुंबईत घर नाही अशांना घर असा निर्णय होतं. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही. पण मिडियाने ठोक ठोक ठोकलं. असं वाटलं की जाऊ देत तो फ्लॅट.फियाट कंपनीकडून पोलीसांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जातेय. साठ टक्के मिळालेल्यांनाही दिली जातेय. खरं तर ऐंशी, नव्वद टक्के मिळालेल्यांना मिळायला हवी. असे ही ते म्हणाले.
Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!
Mumbai-Pune एक्सप्रेसवेवर टँकर पलटी झाल्यानं अपघात