AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु केलंय. वनविभागाचे अधिकारी जुन्नरमध्ये बिबट्या सफारीसाठी कुठला स्पॉट चांगला आहे याची पाहणीसाठी गेले आहेत. ते अधिकारी पुढील आठ्वड्यात त्याबाबत आम्हाला अहवाल सादर करतील. ते झालं की अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन बिबट सफारीचे काम सुरु करण्यात येईल.

Ajit Pawar | जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण
जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे अजित पवारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 11:53 AM
Share

पुणे – जुन्नरची बिबट्या सफारी (Junnar Leopard safari)बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 ला मंजुर झालेला आहे. तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण काल मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil)यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. विधानसभा अधिवेशनात बिबट्या सफारी केंद्र बारामतीला सूर करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितपवार यांच्या टीका केली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असतांना  ते बोलत होते.

जुन्नरमध्ये लवकरच बिबट सफारीचे काम सुरु करणार

आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे. वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरु केलंय. वनविभागाचे अधिकारी जुन्नरमध्ये बिबट्या सफारीसाठी कुठला स्पॉट चांगला आहे याची पाहणीसाठी गेले आहेत. ते अधिकारी पुढील आठ्वड्यात त्याबाबत आम्हाला अहवाल सादर करतील. ते झालं की अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन बिबट सफारीचे काम सुरु करण्यात येईल. असेही अजित पवार म्हणाले आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटलांनी केले आरोप

प्रस्तावित बिबट्या सफारी , शिवसृष्टी बारामतीला पळवता , या पुणे जिल्ह्यात सगळीकडे तुम्हीच का? तुम्ही जुन्नर तालुक्यातील धरणाचे पाणी कर्जतला पळविता. तसेच नियोजित बिबट सफारी, शिवसृष्टी बारामतीला पळवुन नेता..! मात्र माझा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आता पळवुन नेऊ नका? तसेच प्रस्तावित बिबट सफारीबाबत शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यानी आवाज उठविताच.. तर अशा प्रकारची घोषणाच झाली नाही असही म्हणता. कुठ चाललय हे महाआघाडीच राजकारण ! असे म्हणत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

IPL 2022: CSK चा 36 वर्षीय खेळाडू वानखेडेवर KKR वर पडणार भारी, टीम जडेजाचं पारडं जड

kirit somaiya : ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’, मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना, शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबत

Beed | अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू, बीडचे शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश मोरेंचा अपघात की घातपात?

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.