Assembly Election 2022 | पाच राज्यांतील निवडणुकांसाठी काय आहे नियमावली ?

15 जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या बाबींवर बंदी घातली असून ही बंदी कायम राहणार की नाही, याबाबतची माहितीही 15 जानेवारीनंतर जारी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह मणिपूर आणि उत्तरांखंडमध्ये होणाऱ्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी प्रचाराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांना वाढत्या कोरोनाचा फटका बसण्याची दाट शक्यता त्यांच्या घोषणेनं बसण्याची शक्यता आहे. ऑफलाईन अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर निवडणूक आयोगानं बंधनं घातली आहे. 15 जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या बाबींवर बंदी घातली असून ही बंदी कायम राहणार की नाही, याबाबतची माहितीही 15 जानेवारीनंतर जारी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह मणिपूर आणि उत्तरांखंडमध्ये होणाऱ्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI