AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Kolhapur Election Result 2022 | कोल्हापुरात मविआचा दणदणीत विजय

VIDEO : Kolhapur Election Result 2022 | कोल्हापुरात मविआचा दणदणीत विजय

| Updated on: Apr 16, 2022 | 1:55 PM
Share

या विजयानंतर जयश्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा विजयाचे श्रेय आपण कुणाला देणार असा प्रश्न विचारला. यावेळी महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब (सतेज पाटील), हसन मुश्रीफजी आदीसह स्वाभिमानी जनतेला मी हे श्रेय देते, अशी भावना जयश्री जाधव यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा जयश्री जाधव यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे कोल्हापुरात सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या विजयानंतर जयश्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा विजयाचे श्रेय आपण कुणाला देणार असा प्रश्न विचारला. यावेळी महाविकास आघाडी सत्ता, बंटी साहेब (सतेज पाटील), हसन मुश्रीफजी आदीसह स्वाभिमानी जनतेला मी हे श्रेय देते, अशी भावना जयश्री जाधव यांनी व्यक्त केली.