Kolhapur news : मदरशात 11 वर्षाच्या मुलाची 14 वर्षांच्या मुलाकडून शॉक देऊन हत्या अन्… कारण ऐकून तुम्हीही म्हणाल…
सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे त्याला हातकणंगले येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र फैजान याच्या हातावर व पायावर असलेल्या व्रणांमुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले. तपास सुरू केला असता सगळा प्रकार उघडकीस आला.
मदरशात ११ वर्षाच्या मुलाला १४ वर्षाच्या मुलाकडून विजेचा शॉक देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील निजामिया मदरशामधील ही धक्कादायक घडला घडली आहे. मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून आरोपीने ११ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील हातकणंगले-वडगांव रस्त्यावर असलेल्या निजामिया मदरशामध्ये साधारण ७०-८० विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेतात यापैकी बहुंतांश विद्यार्थी हे परराज्यातील आहेत. रविवारी रात्री मदरशातील सगळे मुलं झोपल्यानंतर एका १४ वर्षांच्या मुलाने हा सगळा धक्कादायक प्रकार केला. ज्याची हत्या करण्यात आली त्यांचं नाव फैजान नाजिम असं असून तो मूळचा अररिया जिल्ह्यातील बगडहारा, बिहार येथील रहिवासी आहे. सोमवारी पहाटे या ११ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या मुलाच्या अंगावर काही जखमांचे व्रण देखील होते, असे पोलिसांकडून समजतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

