Ahmedabad Plane Crash : अपघाग्रस्त विमानाबद्दल मोठी माहिती समोर, 12 वर्ष जुनं होतं विमान, शेवटचं मेंटेनन्स कधी? अन् तीन महिन्यांपूर्वीच…
अहमदाबाद येथे झालेल्या अपघातातील विमान हे १२ वर्षे जुनं होतं तर या विमानाच्या राईड साईडच्या इंजिनची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती आणि तीन महिन्यांपूर्वी मार्च २०२५ मध्ये ते बदलण्यात आले होते.
अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. तीन महिन्यांपूर्वीच अपघात झालेल्या विमानाचं इंजिन बदलण्यात आलं होतं. तर १२ वर्ष जुन्या असलेल्या विमानाचं इंजिन मार्च महिन्यात बदलण्यात आलं होतं. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळले आणि या अपघातात १२ क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. या अपघातात एका प्रवाशाशिवाय सर्व २४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
तर समोर आलेल्या माहितीनुसार, या एअर इंडियाच्या विमानाचं मेंटेनन्स जून २०२३ मध्येही करण्यात आलं होतं आणि या वर्षी डिसेंबरमध्ये पुढील मेंटेनन्स करण्यात येणार होता. एप्रिल महिन्यात एअर इंडियाने बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरसाठी विमा संरक्षण ७५० कोटी रुपयांवरून ८५० कोटी रुपये केले आहे. तर अहमदाबादमधील झालेला हा अपघात गेल्या दशकातील देशातील सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक आहे. या दुर्घटनेमुळे विमान वाहतूक विमा क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

