MSRTC : एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने, कारण ऐकाल तर काय….
कोल्हापुरात प्रवासी एसटीमध्ये घेण्यावरून दोन कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. विनंती करायला गेलेल्या एका कंडक्टरला दुसऱ्या कंडाक्टरकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर येथील एसटी बस स्थानकातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कोल्हापुरात प्रवासी एसटीमध्ये घेण्यावरून दोन कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. विनंती करायला गेलेल्या एका कंडक्टरला दुसऱ्या कंडाक्टरकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन कंडाक्टरमधील झालेल्या जोरदार हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील भोगावती बस स्टँड परिसरात कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीची सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक डाऊन झालेल्या एसटीमधील प्रवाशी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून कंडक्टरमध्ये हाणामारी झाली. भोगावती बस स्टँड परिसरात एका बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्या बसमधील कंटक्टर दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवण्याची विनंती करण्यासाठी गेला. परंतु त्या बसमधील कंडक्टर त्याला नकार देताना दिसत आहे. त्यानंतर बसच्या खाली उतरुन तो त्या कंडक्टरला मारहाण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. माराहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?

