…तर आपण बारसूत जाऊया आणि शेतकऱ्यांना वाचवूयात; राजू शेट्टी आक्रमक
Barsu Farmer Andolan : अश्रूधुराचा वापर करत बारसुतील आंदोलकांना पोलिसांनी हटवलं; राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले...
कोल्हापूर : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांकडून आंदोलन केलं जात आहे. अश्रूधुराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी बारसूमधील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं ते म्हणालेत. शेतकऱ्यांवर बेशुद्ध होईपर्यंत लाठीचार्ज केलाय. लोकशाहीच्या राज्यात आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर शरम वाटली पाहिजे. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, आपण रत्नागिरीला जाऊ आणि बारसूमधल्या शेतकऱ्यांना वाचवू. बघू यांच्याकडे गोळ्या किती आहेत. लाठ्या किती आहेत आणि पोलीस किती आहेत ते, असंही राजू शेट्टी म्हणालेत. सरकारनं आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी सरकारने दाखवावी, असंही ते म्हणालेत.
Published on: Apr 28, 2023 03:13 PM
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल

