पेट्रोल फुकट अन् लग्नासाठी पोरगी पाहिजे…, भन्नाट मागण्यांची कुठं निघाली सायकल रॅली? ज्याची होतेय चर्चा
सरकार, केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले. मात्र याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात जी देशभर गाजतात. त्याच कोल्हापुरात आज एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चा सध्या रंगलीये...
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी, २०२४ : कोल्हापूर हे आंदोलनाचे शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक मोठमोठे आंदोलन झालेत त्यामध्ये सरकार, केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले. मात्र याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात जी देशभर गाजतात. त्याच कोल्हापुरात आज एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चा सध्या रंगलीये… ही सायकल रॅली निघालीये कोल्हापुरातल्या खासबाग मैदान येथून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत… या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांमुळे ही रॅली चर्चेत आहे. ज्यामध्ये लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, मटण स्वस्थ झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे.. अशा अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाची ही गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचले… अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत अगदी आबालवृद्ध सहभागी झाले होते.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

