Ratnagiri Rain : जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
Jagbudi River Flood Situation : रायगड जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचं पाणी गावात शिरलं आहे.
कोकणात कालपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील खेड येथे जगबुडी नदीचं पाणी गावात शिरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीचे पाणी मार्केट परिसरात शिरले आहे. अशातच संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविला आहे. त्यामुळे रायगडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजारपेठेत पाणी भरल्याने नागरिकांचे दुकान, घर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे व्यापऱ्यांच्या सामानाचं मोठं नुकसान याठिकाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
