Sindhudurg | कणकवलीमध्ये मुसळधार पाऊस, पावसाचे पाणी इमारतीत शिरले; रहिवाशांची तारांबळ

कणकवलीत आज पहाटे पासून मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील रामेश्वर प्लाझा या इमारतीत पहाटेच्या सुमारास पाणी शिरले. साखर झोपेत असताना पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची मोठी धांदल उडाली. पार्किंग मध्ये शिरलेलं पाणी हळूहळू तळमजल्यावरील घरात पोचले.

कणकवलीत आज पहाटे पासून मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील रामेश्वर प्लाझा या इमारतीत पहाटेच्या सुमारास पाणी शिरले. साखर झोपेत असताना पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची मोठी धांदल उडाली. पार्किंग मध्ये शिरलेलं पाणी हळूहळू तळमजल्यावरील घरात पोचले. अखेर सकाळी सातच्या सुमारास पाणी हळूहळू ओसरले. मात्र या पाण्यामुळे अनेक वस्तूंचे नुकसान झाले. कणकवलीत मागील तीन दिवसात सरासरी 342 मिमी पाऊस पडला आहे. आज पहाटे पासून मुसळधार पडलेल्या पावसाने 11 नंतर विश्रांती घेतली.