Mhada Lottery | कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची उद्या घोषणा

दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांच्या लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 6500 घरं आणि कोकण मंडळ आवास परियोजनेंतर्गत 2000 आणि 20 टक्के योजनेंतर्गत 500 घरांचा समावेश आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 04, 2021 | 8:06 PM

मुंबई : सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न सत्यात उतरवणारी म्हाडा यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांची लॉटरी काढणार असून, या लॉटरीच्या माध्यमातून नऊ हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. म्हाडाचे कोकण मंडळाकडून याबाबतची जाहिरातदेखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घरांच्या लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. लॉटरीमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 6500 घरं आणि कोकण मंडळ आवास परियोजनेंतर्गत 2000 आणि 20 टक्के योजनेंतर्गत 500 घरांचा समावेश आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें