लाडक्या बहिणींना महिला दिनाचं खास गिफ्ट! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी उलटून गेला त्रि अद्याप पैसे मिळाले नसल्याने पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा होती. मात्र खास महिला दिनाचे औचित्य साधून सरकारने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिलांना अद्याप मिळालेले नव्हते. मार्च सुरू झाला तरी अद्याप फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे पैसे फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांसाठी मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महिला दिनाचे औचित्य ठेऊन आम्ही फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना देत आहे. हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. विरोधक टीका करत असले तरी आम्ही प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत महिला दिन असल्याने देण्याचं आमचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महिला दिनाचे गिफ्ट म्हणून दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे, असं अदिती तटकरे यांनी म्हंटलं आहे.